पुण्याच्या व्यावसायिकाची कोल्हापुरात कुटुंबासमवेत सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न 

पती-पत्नीचा मृत्यू तर मुलाची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर –
व्यवसायातील नुकसानीमुळे आर्थिक तोट्यात आलेल्या पुणे परिसरातील पिरंगूट इथल्या लेबर काँट्रॅक्टर विनोद रमाकांत जोशी यांनी कुटुंबीयासह कीटकनाशक प्राशन करून सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात विनोद जोशी आणि त्यांच्या पत्नी मीना जोशी यांचा मृत्यू झाला, तर मुलगा श्रेयस याची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यवर्ती व्हीनस कॉर्नर ते कोंडाओळ मार्गावरील पल्लवी लॉजमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी रात्री मध्यरात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला.

पर्यटनासाठी कोल्हापुरात आलेल्या पिरंगुट येथील दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या केली. लक्ष्मीपुरी परिसरातील हॉटेल पल्लवी येथे हा प्रकार घडला. विनोद रमाकांत जोशी , त्यांची पत्नी मीना (५५) अशी त्यांची नावे आहेत. मुलगा श्रेयस याची प्रकृती गंभीर आहे. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. त्यांनी आर्थिक अडचणी आणि कर्जाला कंटाळून सहकुटुंब आत्महत्या करीत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी कुंटुबीय २६ जूनला कोल्हापुरात आले होते. दोन दिवसांसाठी त्यांनी हॉटेल बुक केले होते. २७ जून रोजी तिघांनी रात्री जेवण केले. त्यानंतर खोलीचा दरवाजा बंद करुन घेतला. २८ जूनला त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊन लागल्याचे वेटरने हॉटेलमालकाला सांगितले. त्यांनी शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिस तत्काळ दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा फोडून पाहिले असता तिघेही बेशुद्धावस्थेत आढळले. घटनास्थळी पोलिसांना विषाची बाटली सापडली. मुलगा श्रेयसचा श्वास सुरू होता. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जोशी दाम्पत्याने गुरुवारी रात्री विष प्राशन केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरुन त्याची ओळख पटविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)