परप्रांतीयांवरील हल्ले हा कॉंग्रेसचाच कट 

नितीनभाई पटेल यांचा आरोप

मुंबई – रोजगारानिमित्त गुजरातमध्ये आलेल्या उत्तरप्रदेशी, बिहारी लोकांच्या मनात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजविघातक शक्‍तींनी केला. अनेक परप्रांतीय नागरिकांवर हल्ले करून त्यांना गुजरात सोडण्यास भाग पाडले. हा कॉंग्रेस आमदाराचाच पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांनी केला. पोलीस या विरोधात योग्य ती कारवाई करत असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. नितीनभाई पटेल आज मुंबईत आले होते. त्यावेळी सह्यादी अतिथीगृह येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधील परप्रांतीयांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.या सर्वाच्या मागे कॉंग्रेसचे एक आमदार व त्यांनी स्वतः स्थापन केलेली एक संघटना असल्याचे दिसून येत आहे.

गुजरात पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई सुरू केल्याने गुजरातमधील परप्रांतीयांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही नितीनभाई पटेल म्हणाले . छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचा आदर्श आहेत.भारताची संस्कृती वाचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.त्यांच्यामुळेच आपला देश,आपली संस्क्‍ती आणि आपला धर्म वाचला.त्यांचे स्मारक उभे करताना पुतळयाच्या उंचीवरून वाद न होता त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा पुतळा महाराष्ट्रात उभा राहावा असे मत गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांनी व्यक्‍त केले. देशाची एकता आणि अखंडता टिकविणा-या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या जगातील सर्वात मोठया पुतळयाचे अनावरण 31 ऑक्‍टोबर रोजी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

-Ads-

सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली देण्यासाठी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा उभारण्यात आला आहे. हा 182 मीटरचा जगातील सर्वात ऊंच पुतळा असून यामुळे देशातील पर्यटन उद्योगाला गती मिळणार आहे. हा पुतळा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. 15 हजार पर्यटक एका दिवशी भेट देऊ शकतील एवढी याची क्षमता आहे. सरदार संग्रहालय, 8 कि.मी ची फ्लावर व्हॅली या स्थळाचे आकर्षण आहे. महाराष्ट्रातील जनतेने देखील स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)