“त्या’ भ्याड हल्ल्याचा प्राचार्य फोरमकडून निषेध

पुणे – कॅम्प परिसरातील पूना कॉलेजमधील प्राचार्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्राचार्य फोरमकडून शनिवारी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, सचिव डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. संजय चाकणे, डॉ. संजय खरात, डॉ. सी. एन. रावळ, डॉ. शोभा इंगवले, डॉ. के. सी. मोहिते, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. दिलीप शेठ, डॉ. नितिन घोरपडे तसेच अंजुमन खैरूल इस्लाम संस्थेचे ट्रस्टी मिर्जा सलात बेग यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील 50 प्राचार्य उपस्थितत होते. दरम्यान, संबंधितावर गुन्हा नोंदवून प्राचार्य व सहकाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी यावेळी फोरमच्या वतीने करण्यात आली.

शुक्रवारी (दि. 10) दुपारी दोनच्या सुमारास पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख हे नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात दैनंदिन काम करत असताना, सुरक्षा रक्षकास व इतर कर्मचाऱ्यांना शिविगाळ करीत काही व्यक्ती त्यांच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसले. प्राचार्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत दमदाटी करण्यात आली. या हल्ल्यामध्ये कार्यालयाचे नुकसान झाले असून, अशा पध्दतीने थेट प्राचार्यांना शस्त्राचा धाक दाखविल्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा घटनांना चाप बसावा यासाठी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी फोरमच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)