बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवाद्याला अटक

बर्धमान (पश्‍चिम बंगाल) – बोधगयेमध्ये 2018 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील “जमातुल मुजाहिदीन-बांगलादेश’ या संघटनेचा दहशतवाद्याला आज पश्‍चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातल्या कावटा येथे अटक करण्यात आली. अब्दुल रहिम असे या दहशतवाद्याचे नाव असून कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने रहिम याला अटक केली. रहिम हा मूळचा मूर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्या संघटनेमध्ये नवीन सदस्यांची भरती करण्याचा तो प्रयत्न करत असतानाच त्याला अटक करण्यात आली.

रहिम हा “जमातुल मुजाहिदीन-बांगलादेश’च्या धुलियान मोड्युलचा तो सक्रिय सदस्य आहे. संघटनेच्या याच मोड्युलने बोधगयेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. मुर्शिदाबाद आणि बर्धमान येथील काही मदरसांचा वापर “जेएमबी’कडून कट्टरवाद पसरवण्यासाठी आणि नवीन भरती करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिहारमधील बोधगयेमध्ये तिबेटचे सर्वोच्च नेते आणि बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या प्रवचनानंतर काही काळातच एक कमी क्षमतेचा बॉम्बस्फोट झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)