सैन्य दलांनी नेहमीच अतुलनिय शौर्य दाखविले- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: आजची “मन की बात’ सुरु करताना आज मन भरुन आले आहे. दहा दिवसांपूर्वी भारतमातेने आपल्या वीर पुत्रांना गमावले. या पराक्रमी वीरांनी आपल्या सव्वाशे कोटी भारतीयांच्या संरक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले. देशवासीयांनी निश्‍चिंत रहावे यासाठी आपल्या या शूर-विरांनी दिवसरात्र एक केले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, आपल्या सैन्य दलांनी नेहमीच अतुलनिय शौर्य दाखवून दिले आहे. एकाबाजूला त्यांच्याकडे अशांत भागात शांतता प्रस्थापित करण्याचे कौशल्य आहे. दुसरीकडे ते दहशतवादाला त्यांच्या भाषेत कसे उत्तर द्यायचे याची त्यांना चांगली माहिती आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वातंत्र्यानंतर अद्याप आपल्याकडे शहीदांच्या सन्मानार्थ युद्ध स्मारकाची उभारणी झाली नाही. मात्र, आता ही प्रतिक्षा संपली आहे. भारताकडे राष्ट्रीय युद्ध स्मारक नाही यामुळे मी आश्‍चर्यचकीत झालो होतो, त्याचे मला मनस्वी दुःखही झाले. मात्र, आम्ही हे युद्ध स्मारक उभारले असून हे नवे स्मारक इंडिया गेट आणि अमर जवान ज्योतीजवळ असल्याची माहिती यावेळी मोदींनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)