IPL2019 : आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई -भारतीय क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या आयपीएल या बहुप्रतीक्षित स्पर्धेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या 2 आठवड्यांचे वेळापत्रक या पूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदाच्या मोसमाचे उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवडणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येणार होते. त्यानुसार आता साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

भारतात लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे या कालावधीत सात टप्प्यात होणार आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने वेगळ्या शहरांमध्ये खेळवण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. विशेषतः मुंबई आणि कोलकाता या प्रमुख शहरांतील सामने हलवण्यात येतील, अशी चर्चा होती. पण, बीसीसीआयनं हे सामने प्रमुख शहरांतच खेळवण्याची तारेवरची कसरत पार केली. बीसीसीआयने मंगळवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकात साखळी सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामाची सुरुवात करणार असून त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी होणार आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. 24 मार्चला हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. अशा “हाय व्होल्टेज’ सामान्यांनी स्पर्धेची सुरुवात होणार असल्यामुळे सर्वच जण यंदाच्या स्पर्धेकडे डोळे लावून बसले आहेत. त्यानुसार स्पर्धेतील साखळी सामन्यांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे.

मात्र, उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक, प्ले ऑफ्स चे सामने आणि अंतिम सामना याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. त्यानुसार एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. यात 12 मे या तारखेला अंतिम सामना होणार असे दिसत होते. मात्र काही वेळातच ते वेळापत्रक हटवण्यात आले.

 

साखळी फेरीचे संपूर्ण वेळापत्रक

1) 23 मार्च -चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू – चेन्नई
2) 24 मार्च – कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद- कोलकाता
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स -मुंबई
3) 25 मार्च -राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब -जयपूर
4) 26 मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स – दिल्ली
5) 27 मार्च – कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब – कोलकाता
6) 28 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स – बंगळुरू
7) 29 मार्च – सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स – हैदराबाद
8) 30 मार्च – किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स – मोहाली
दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स – दिल्ली
9) 31 मार्च – सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – हैदराबाद
चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स – चेन्नई
10) 1 एप्रिल – किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स – मोहाली

11) 2 एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅंलेंजर्स बंगळुरू – जयपूर
12) 3 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स – मुंबई
13) 4 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद – दिल्ली
14) 5 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स – बंगळुरू
15) 6 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब – चेन्नई
सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्सहैदराबाद
16) 7 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स – बंगळुरू
राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स – जयपूर
17) 8 एप्रिल – किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद – मोहाली
18) 9 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स – चेन्नई
19) 10 एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब – मुंबई
20) 11 एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स – जयपूर

21)12 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स – कोलकाता
22) 13 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स – मुंबई
किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – मोहाली
23) 14 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स – कोलकाता
सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स – हैदराबाद
24) 15 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – मुंबई
25) 16 एप्रिल – किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स – मोहाली
26) 17 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स – हैदराबाद
27) 18 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स – दिल्ली
28) 19 एप्रिल – कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – कोलकाता
29) 20 एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स – जयपूर
दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब – दिल्ली
30) 21 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स – हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स – बंगळुरू

31) 22 एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स – जयपूर
32) 23 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद – चेन्नई
33) 24 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब – बंगळुरू
34) 25 एप्रिल – कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स – कोलकाता
35) 26 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स – चेन्नई
36) 27 एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद – जयपूर
37) 28 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – दिल्ली
कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स – कोलकाता
38) 29 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब – हैदराबाद
39) 30 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स – बंगळुरू
40) 1 मे – चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स – चेन्नई

41) 2 मे  – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद – मुंबई
42) 3 मे – किंग्स इलेव्हन पंजाबवि.कोलकाता नाईट राइडर्स – मोहाली
43) 4 मे – दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स – दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद – बंगळुरू
44) 5 मे – किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स – मोहाली
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स – मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)