इस्राईलमध्ये 7 महिने आगोदरच निवडणूकांची घोषणा

जरुसलेम: इस्राईलमध्ये सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या 7 महिने आधीच निवडणुकीची घोषणा झाली आहे. एप्रिलमध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करणारे नेतन्याहू यांनी सोमवारी एप्रिलमध्ये निवडणुकीची घोषणा केली. त्यांच्याविरोधात भ्रष्टाराचा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी देखील सुरु आहे. या निवडणूकांच्या संदर्भाने मतदारांचा कलही जाहीर झाला असून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्‍यता आहे.

इस्राईलमधील वर्तमानपत्रांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये नेतन्याहू पुन्हा पंतप्रधान होणार असे दिसते आहे. लिकुद पक्षाला 120 पैकी 30 जागा मिळू शकतात. या पक्षाकडे आताही इतक्‍याच जागा आहेत. माजी लष्कर प्रमुख बेन्नी गांत्ज यांच्या पक्षाला 13 जागा मिळण्याची शक्‍यता आहे. हा पक्ष दूसऱ्या स्थानी राहू शकतो. बेन्नी यांच्या पक्षाचे नाव अजून जाहीर झालेले नाही. ते निवडणुका लढवणार की नाही याबाबत देखील अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)