राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘लोकसभा निवडणूक २०१९’ साठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई: माजी विधानसभा अध्यक्ष, ज्येष्ठ नेते दिलीप वलसे पाटिल, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे विमोचन करण्यात आले. तीन भाषेत जाहीरनामा प्रकाशित केला गेला आहे. दिल्लीतही जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले आहे.

 • राष्ट्रीय विषय कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
 • आओ मिलके देश बनाये ही टॅग लाईन आहे. ज्या अर्थ आम्हाला देशाचा, सर्वत्र विकास करायचा आहे.
 • शेतकरी, युवा, महिला यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत एनडीए जाहीरनामा जाहीर केला होता त्यात भ्रष्टाचार मुक्त भारत करू असे सांगितले होते मात्र तसे झाले नाही. भांडवलदारांना सोबत घेऊन हे सरकार भ्रष्टाचारात प्रचंड बरबटलेले आहे. राफेलची चर्चा संपूर्ण जगात आहे.

 • अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे, महागाई वाढली आहे, बेरोजगार वाढला आहे, फसलेल्या परराष्ट्र धोरणामुळे देशात अशांतता निर्माण झाला आहे. देशातील शेतकरी नाउमेद झालेला आहे.
 • जातीजातीत भांडण लावून देशात एक विषय पक्ष राजकीय फायदा घेऊ ईच्छीतो आहे. सरकारला प्रश्न विचारला की देशद्रोही ठरवले जात आहे.
 • संविधानाचा आत्म नष्ट केला जात आहे. आपल्या ताकदीचा चुकीचा उपयोग केला जात आहे. म्हणून या शक्तींना पराभूत करण्यासाठी सर्व जण एकत्र आले आहेत.

आज देशातील स्वायत्त संस्था आपली स्वायत्तता गमवत आहे. त्यामुळे आरबीआयचे गव्हर्नर राजीनामा देत आहे. या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही संदेश देत आहोत की स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य जपले जाईल.

 • जीएसटी आर्थिक विकास घटवण्यास जबाबदार आहे.
 • आज शेतकरी प्रचंड बर्बाद झाला आहे. आम्ही आश्वासन देतो की सत्तेत आल्यावर १० दिवसात देशातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन बळीराजाचा ७/१२ कोरा करू.
 • आज देशात प्रचंड बेरोजगारी आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करून, कौशल्य विकासाला चलना देण्याचे काम आम्ही करू.
 • महिलांना न्याय मिळेल, राजकीय वर्तुळात सक्षम स्थान मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू.
 • अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण आज धोक्यात येण्यासारखी परिस्थिती आहे. आम्ही या सर्व समाजाला न्याय मिळेल. अल्पसंख्याक, ओबीसी समाजाला योग्य आरक्षण कसे मिळेल त्याचा प्रयत्न केला जाईल.
 • मुलींना पदव्युत्तरपर्यंत शिक्षण मोफत दिले जाईल.
 • सरकारी रुग्णालयाचे आधुनीक करू, उत्तम आरोग्य सेवा देऊ.
 • नागरी सुविधा बळकट करण्याला प्राधान्य दिले जाईल
 • कामगारांच्या फायद्यायसाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. मात्र यात कामगारांचे हीत लक्षात घेतले जाईल.

संपूर्ण जाहीरनामा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

https://ncp.org.in/adminpanel/magazine/NCP%20Manifesto%20Loksabha%202019_Marathi_V3_Hires_r%20(1).pdf

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)