इंडोनेशिया विमानाच्या वैमानिकाने मागितली होती परतण्याची परवानगी 

जकार्ता – उड्डाणाच्या काही मिनिटांतच इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळण्याची कारणे आता हळूहळू समोर येत आहेत. या विमानात आधीच तांत्रिक बिघाड झाला होता. वैमानिकाला ही बाब लक्षात आल्यावर त्याने परतण्याची परवानगीही मागितली होती, असे आता स्पष्ट होते आहे.

हे विमान रविवारी बालीहून जकार्ताला पोहोचले होते. या उड्डाणादरम्यानच विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. वैमानिकाजवळचे एअरस्पीड रीडिंगचे उपकरण योग्य रीडिंग देत नव्हते. म्हणजेच विमानाचा वेग किती आहे, याची खरी माहिती वैमानिकाला मिळत नव्हती. शिवाय वैमानिक आणि सहवैमानिकाजवळ विमानाच्या उंचीची आकडेवारी देणारी उपकरणंही वेगवेगळी माहिती देत होती. याच कारणामुळे चालक दलाने जकार्ताला परतण्याचा निर्णय घेतला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लायन एअरलाईन्सचे कार्यकारी अधिकारी एडवर्ड सिराईड यांनी देखील हे कबूल केले आहे. मात्र बिघाड नंतर दुरुस्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. सोमवारी हे विमान जकार्ताहून पंगकल पिनांग या इंडोनेशियातल्या पश्‍चिमेकडे असलेल्या शहरासाठी रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)