पुणे-लोणावळा मार्गावर दुपारच्या लोकल 2 दिवस रद्द

पुणे – पुणे-लोणावळा मार्गावर दुपारी 1.00 वाजता सुटणारी (99818) क्रमांकाची आणि 2.00 वाजता सुटणारी (99813) रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे ते लोणावळा या मार्गावर दुपारी 12.15 वाजता सुटणारी लोकल क्रमांक (99816) 15 मिनिटे लवकर म्हणजेच 12 वाजता सुटणार आहे. त्यामुळे दि.30 आणि 31 मार्चरोजी दुपारच्या लोकल धावणार नाहीत.

पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान दुरूस्तीच्या कारणास्तव दि. 31 मार्चपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नल आणि इतर दुरूस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

विजापूर-मुंबई पॅसेंजर पुण्यापर्यंतच धावणार
रेल्वेच्या मुंबई विभागाने काही कारणास्तव ब्लॉक घेतल्याने त्याचा परिणाम मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर होणार आहे.

दि. 2 एप्रिल रोजी विजापूर ते मुंबई या मार्गावर धावणारी 51030 क्रमांकाची पॅसेंजर गाडी पुण्यापर्यंतच धावेल. पुणे ते मुंबई या मार्गावर ही गाडी धावणार नाही. त्याचबरोबर दि. 8 एप्रिल रोजी धावणारी मुंबई ते विजापूर या मार्गावर धावणारी 51029 क्रमांकाची गाडी मुंबई ते पुणे या मार्गावर धावणार नाही. ही गाडी थेट पुण्याहून दि. 9 एप्रिल रोजी नियोजित वेळेनुसार 4.20 वाजता विजापूरकडे रवाना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)