अफगाण लष्कराने 27 इसिस दहशतवादी, तर तालिबानने 15 पोलीस मारले

काबुल (अफगाणिस्तान): अफगाणिस्तानच्या खास लष्कराने इसिसविरोधी मोहिमेत 27 इसिस दहशतवादी मारले आहेत. नांगरहार प्रांतात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलातील 15 पोलीस मारले गेले आहेत.

हेलिकॉप्टर गनशिपच्या संरक्षणाखाली खास लष्कराने नांगरहार प्रांतातील अचिन जिल्ह्यात इसिसविरोधी कारवाई केल्याची माहिती प्रांतिक परिषद सदस्य अजमल ओमर यांनी दिली आहे. नांगरहार हा इसिसचा बालेकिल्ला समजला जातो. या कारवाईत मारल्या गेलेल्या 27 दहशतवाद्यांमध्ये सादिक यार आणि सईद ओमर हे दोन स्थानिक नेतेही मारले गेल्याचे ओमर यांनी सांगितले. मात्र या मोहिमेत अमेरिकन लष्कराचा सहभाग होता की नाही, याबाबत ओमर यांनी काही माहिती दिलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर भागात तालिबानने सर-ए-पुल प्रांतात दोन जोरदार हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 15 पोलीस ठार झाले आणि 21 जखमी झाले आहेत. सय्यद जिल्हा आणि सर-ए-पुलमध्ये जोरदार धुमश्‍चक्री चालू असल्याचे प्रांत प्रमुख मोहंमद नूर रहमान यांनी सांगितले. या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी तालिबानने स्वीकारल्याचे तालिबान प्रवक्ता कारी युसूफ अहमद यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)