विधानसभेसाठी प्रशासन लागले कामाला

अमरसिंह भातलवंडे

19 ऑगस्टला प्रसिध्द होणार अंतिम मतदार यादी
नाव नोंदणी सुरू : 30 जुलैपर्यंत स्वीकारणार हरकती

बैठक घेऊन माहिती देणार

निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यापूर्वी राजकीय पक्षाबरोबरच स्वतंत्रपणे बैठका घ्याव्यात व राजकीय पक्षांना पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती द्यावी, तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदार यादीमधील दावे व हरकतीची माहीती राजकीय पक्षांना दर आठवड्याला द्यावी असे आदेशदेण्यात आले आहेत.

..तर शिस्तभंगाची कारवाई होणार

मतदार नोंदणी अधिकारी व अतिरिक्‍त मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामाच्या प्रगतीची माहिती इरो नेट डॅशबोर्टवर वेळोवेळी अपटेड करायची आहे. या शिवाय या माहितीचा नियमित आढावा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावयाचा आहे. या कामामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

पिंपरी  – लोकसभा निवडणूक झाल्यापासून विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणूक विभागानेही विधानसभा निवडणुकीची तयारी केली असून निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावनोंदणीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. सोमवार (दि.15) पासून मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे.

निवडणूक आयोगाने येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन तयारीला सुरवात केली आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मतदार याद्यांची दुरुस्ती तसेच नवीन नाव नोंदणीला प्रारंभ केला आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2019 या आर्हता दिनांकावर आधारित विशेष पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत नागरिकांना मतदान नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी व त्यांचा मतदार यादीमध्ये समावेश व्हावा, यासाठी दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता हा कार्यक्रम 15 जुलै ते 19 ऑगस्ट दरम्यान राबविला जाणार आहे. 15 जुलै रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्द होणार आहेत. प्रसिध्द केलेल्या यादीवर दि. 15 जुलै ते 30 जुलै दरम्यान दावे व हरकती दाखल करण्याची संधी राजकीय पक्षांना दिली जाणार आहे.

ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होऊ शकलेले नाही अशा नगारिकांसाठी दि.20, 21, 27 व 28 जुलै रोजी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नवमतदारांना आपले नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. तर 5 ऑगस्ट रोजी पर्यवेक्षक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान नोंदणी अधिकारी नावांची तपासणी करणार आहेत. राजकीय पक्षांचे दावे निकाली काढण्यासाठी 13 ऑगस्ट हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार यादी निरीक्षक यांच्याद्वारे मतदार याद्यांची विशेष तपासणी ही दि. 16 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दि. 19 ऑगष्ट रोजी विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदान यादी प्रसिध्द होणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील मतदारयादीमध्ये काही प्रमाणात झालेला गोंधळ लक्षात घेऊन यावेळी निवडणूक आयोगाने मतदार यादीमध्ये मतदारांचे 100 टक्के फोटो व्हावेत, याचे निर्देश दिले आहेत. तसेच 30 जून रोजी प्रसिध्द झालेल्या मतदारयादीतील त्रुटींचे विश्‍लेषन करुन त्या चुका दुरुस्त कराव्यात, असेही निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)