मुंबई – अभिनेत्री तापसी पन्नू आणि विकी कौशल यांची ‘मनमर्जियां’मधील ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. मागील वर्षात ‘मनमर्जियां’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे होता. या चित्रपटात आभिषेक बच्चन, विकी कौशल आणि तापसी पन्नू यांनी अभिनय केला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जेमतेम चालला होता. तरीही विकी आणि तापसीच्या अभिनयाचं कौतुक मात्र झालं. पण आता नुकत्याच एका शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे तापसी सध्या चर्चेत आली आहे. या शोमध्ये तापसीनं विकीला मॅरेज मटेरिअल म्हणत, त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तापसी पन्नू आणि विकी कौशल यांनी नुकतीच नेहा धुपियाच्या ( BFF’s with Vogue) च्या सीझन 3 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तापसीनं ‘मनमर्जियां’चं शूटिंग सुरू होण्याआधीपासून आम्ही दोघंही हॉट्सअॅपवर एकमेकांशी बोलायचो पण या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी आमची मैत्री घट्ट झालं असं सांगितलं.
यावर विकीनं, तापसी खूपच मनमोकळी आणि बोलकी आहे आणि मी खूप चांगला श्रोता आहे अशी कोपरखळी तिला मारली. या शोमध्ये तापसीनं विकी मला विकी हॉट वाटत नाही असंही म्हटलं. तिला अभिषेक बच्चन, वरुण धवन आणि विकी कौशल यांच्यामधून ‘हुकअप, लग्न आणि खून’ यांची निवड करण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी तिनं वरुणसोबत हुकअप, अभिषेकचा खून आणि विकी कौशलशी लग्न करेन असं सांगितलं. तसेच तिनं विकी मॅरेज मटेरिअल आहे असंही म्हटलं.