कोळसा घोटाळ्यातील दोषींना बुधवारी शिक्षा सुनावणार

नवी दिल्ली: कोळसा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले कोळसा विभागाचे सचिव एच.सी. गुप्ता आणि अन्य पाच जणांना दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाकडून 5 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. पश्‍चिम बंगाल मधील कोळसा खाणीचे परवाने एका खासगी कंपनीला देताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे हे प्रकरण आहे.

आरोपींच्या शिक्षेच्या संबंधात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद नोंदवून घेण्याची प्रक्रिया आज संपली. संबंधीत आरोपींना सात वर्षाच्या कारवासाची शिक्षा दिली जावी अशी मागणी यावेळी सीबीआयच्यावतीने करण्यात आली. तसेच संबंधीत कंपनीवर जबर दंड लागू करावा अशीही मागणी सीबीआयने केली आहे. आरोपींच्या वकिलांनी आपल्या अशिलांबाबत सहानुभुतीने विचार व्हावा अशी विनंती आज न्यायालयाला केली. या आरोपींना 30 नोव्हेंबर रोजी दोषी ठरवण्यात आले आहे. पश्‍चिम बंगाल मधील मधुजोरे येथील दोन कोळसा खाणीचा परवाना एका खासगी कंपनीला देताना त्यात गैरप्रकार झाल्याचे हे प्रकरण आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)