आमदार संग्राम जगतापांची गैरहजेरी, तर विधाते यांची हजेरी !

शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांची उपस्थित ठरली चर्चेचा विषय

नगर: राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या आजच्या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची गैरहजेरी, तर पक्षातून बडतर्फ झालेले शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांची उपस्थित चर्चेचा विषय ठरली. आमदार जगताप यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याने ते आंदोलनात सहभागी झाले नसल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पक्षातून बडतर्फ केलेले शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते मोर्चात सहभागी झाले होते. पक्षनिरीक्षक समोरच त्यांच्या उपस्थितीचे दृश्‍य चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. मोर्चात बडतर्फ शहर जिल्हाध्यक्षांनी लावलेली हजेरी म्हणजे, पक्षश्रेष्ठींनी केलेली कारवाई खरोखरच आहे का, हा देखील विषय चर्चेत आला आहे. कारवाई नुसती सोपास्कार तर नाही ना, असे म्हटले जाऊ लागले आहे. मोर्चा मुद्यांपेक्षा उपस्थिती व अनुपस्थितीमुळे चर्चेचा विषय ठरला.


पक्षश्रेष्ठींनी कारवाई पदाबाबत केली आहे. मी पक्षाचा आणि आमदार अरुण जगताप यांचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करत राहणार आहे. मोर्चातील मुद्दे गंभीर होते. त्याला न्याय मिळाला पाहिजे. पदापेक्षा समाजिक प्रश्‍नांवर आवाज उठविणे गरजेचे आहे.
प्रा. माणिकराव विधाते
राष्ट्रवादी कॉंग्रेस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)