‘त्या’ महिलेने चक्क लाखोंच्या लक्झरी कारवर सारविले शेण 

नवी दिल्ली – देशात उष्णतेची लाट आली असून सूर्य आग ओकत आहे. ऊन टाळण्यासाठी लोक वेगवेगळ्या शक्कली लढवत आहे. विशेषतः दुचाकीवर बाहेर पडताना आपले संपूर्ण शरीर झाकून घेतले जाते. दरम्यान, चारचाकी वाहनातील लोक सर्वच ऋतूंमध्ये सुरक्षित असतात. परंतु, सोशल मीडियावर सध्या एका असा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत संपूर्ण कारवर गायीचे शेण पसरविले आहे.

गुजरातस्थित अहमदाबादमधील एका महिलेने टोयोटा कंपनीची Corolla Altis या कारला गायीच्या शेणाने लिंपले आहे. केवळ उन्हाच्या चटक्यापासून सुटका मिळावी यासाठी त्या महिलेने लाखो रुपयांच्या कारवर शेण सारविले आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)