“त्या’ घटनेने मला नम्र बनविले- लोकेश राहुल

बेंगळूरू: कॉफी विथ करण मधील त्या वादाने मला नम्र बनविले. त्या वादामुळे मला काही दिवास आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागाले. बंदी चा मी माझ्या तंत्रात सुधारणा करण्यासाठी वापर केला. असे वक्तव्य ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 47 धावांची खेळी करणाऱ्या  केले आहे.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 गडी राखत भारताचा पराभव केला. यामध्ये लोकेश राहुलने 26 चेंडूत 47 धावांची खेळी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉफी विथ करण मधील वादामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले होते तर काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावरही बंदी लादण्यात आली होती. याबाबत बोलताना राहुल म्हणाला, देशासाठी खेळण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. काही निवडक खेळाडूंना ही संधी मिळते. त्यामुळे मिळालेल्या संधीचे मला सोने करायचे होते. मलादिल्या गेलेल्या संधीचा मी आदर करतो, प्रत्येक वेळी मी मझ्यावरील अपेक्षांवर खरे उतरन्याचा प्रयत्न करेल.

वादाबाबत बोलताना तो म्हणाला, माझ्यासाठी बंदीचा काळ कठीण होता. एक खेळाडू, एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या जीवनात असे कठीण प्रसंग येत असतात. ती वेळ माझ्यासाठी त्याच प्रकारची होती. त्या प्रसंगातून सावरून मी पुन्हा पुनरागमन करू शकलो. मिळालेल्या वेळेचा मी सारात्मकतेने वापर केला आणि माझ्या तंत्रात सुधारणा केली. त्यामुळे मी समाधानी आहे.

राहुल द्रविडने केलेल्या मार्गदर्शनाबाबत बोलताना तो म्हणाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसल्याने मागील महिन्यात मी भारत अ संघासाठी निवडली गेली. तेथे मी राहुल द्रविडशी क्रिकेटच्या अनेक मुद्‌द्‌यांवर चर्चा केली. त्याने नाझ्या खेळातील बलस्थाने आणि काच्चे दुवे दखवले. त्यानंतर मी त्यामध्ये सुधारणा घडवुन आणली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून पुन्हा राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना किंवा भारत अ साठी खेळताना मला कोणताही फरक जणवला नाही. असेही तो या वेळी म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)