गणेशोत्सवाप्रमाणे छटपूजेसाठी कृत्रिम तलाव उभारावा – मनसे

File photo

ठाणे – लोकसभा 2019 निवडणुकीच्या तयारीला अाता सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. 2019 च्या निवडणुकीत उत्तर भारतीय मतांसाठी राम मंदिराच्या मुद्यानंतर शिवसेनेकडून आता छटपूजेला पाठिंबा देण्यात येत आहे. ठाण्यात शिवसनेनेकडून छटपूजा महोत्सवासाठी शुभेच्छा देणारं बॅनर लावण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे, ठाणे हे तलावांचे शहर म्हणून अोळखले जाते. दरवर्षी ठाण्यात विविध तलावांवर छटपूजेचं आयोजन केलं जाते. या छटपूजेदरम्यान बऱ्याच प्रकारच निर्माल्य हे पाण्यात टाकल जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतं. त्यामुळे ठाणे मनसेकडून छटपूजेसाठी कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

-Ads-

गणेशोत्सवावेळी कृत्रिम तलाव उभारला जातो, मग छटपूजेसाठी का नाही ? असा सवाल मनसेकडून उपस्थित केला गेला असून गणेशोत्सवाप्रमाणे छटपूजेसाठी कृत्रिम तलाव उभारावेत,अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी ठाणे मनसेच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महापालिकेला निवदेन देण्यात आलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)