चिमुकलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या पंरप्रातीय आरोपीला ‘मनसे’कडून चोप

ठाणे – एका लहान मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या परप्रांतीय आरोपीला पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषदेत हजर केलंं आणि माध्यमांसमोर त्याला चांगलाच चोप दिला.

आरोपी हा 53 वर्षीय असून तो मूळचा बिहारचा आहे. या अारोपीने अडीच वर्षीय मराठी मुलीसोबत गैरवर्तनाचा प्रयत्न केला. हा व्हिडीअो व्हायरल होत होता. त्याला मनसे कार्यकर्त्यांनी पकडले. आतापर्यंत  या आरोपीने तीन लहान मुलींशी अस कृत्य केलं आहे. अशी माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदे दरम्यान दिली.

याबाबत पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, संबंधित परप्रांतीयवर तातडीने कारवाई करा, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने कारवाई करेल असा इशारी आम्ही दिला होता. त्यानंतर व्हिडीअो व्हायरला झाल्यानंतर पोलीसही या आरोपीचा शोध घेत होते.

1 COMMENT

  1. शिक्षा गुन्ह्याकडे बघून दिलीये की आरोपी परप्रांतीय आहे म्हणून दिली आहे मनसे ने?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)