अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

-जिल्हा परिषद दणाणली
-प्रलंबित प्रश्‍नांकडे वेधले लक्ष

नगर – अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने थाळीनाद आंदोलन करून जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाने जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला होता. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, इतर राज्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना मानधन द्यावे, सेवासमाप्ती लाभामध्ये तीपटीने वाढ करुन, त्यांना दरमहा पेन्शन लागू करावी.

मिनी अंगणवाडीचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीमध्ये करावे, अंगणवाडी केंद्रांना रजिस्टर्स व अहवाल फॉर्म द्यावे, अतिरिक्त चार्जच्या पैश्‍यात वाढ करावी आदी अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ, शांता गोरे, सुरेखा विखे, सुनिता कुलकर्णी, विजया घोडके, शोभा तरोटे, मंगळ ढगे, शोभा लोकरे, छाया शिंदे, फुंदेताई, मंगल साखरे, कौशल्या झाडे, राजू लोखंडे आदिंसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)