सोलापूरात अंगणवाडी सेविकांचा “थाळीनाद’

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोषण अभियानात केलेली 1500 रुपयांची मानधनवाढ तातडीने देण्याबरोबरच इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून “थाळीनाद’ केला. ताटल्यांच्या कडकडाटाने जिल्हा परिषद परिसर सुन्न झाला होता. अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतनश्रेणी देण्याची जुनी मागणी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये झालेल्या पूरक पोषण आहार अभियान कार्यक्रमात पंधराशे रुपयांची तुटपुंजी मानधनवाढ जाहीर केली. ही वाढ ऑक्‍टोंबर 2018 पासूनच लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

मात्र चार महिने उलटले तरीसुद्धा याची अंमलबजावणी झालेली नाही. केवळ घोषणा करून सरकारने तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचा-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप सूर्यमणी गायकवाड यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)