इराणमध्ये चाबहार बंदरावर दहशतवादी हल्ला

दोन जण ठार; अनेक जण जखमी

चाबहार पोलिस मुख्यालयाजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोट

तेहरान: इराणमधील चाबहार बंदरावर आज झालेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यामध्ये दोघेजण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. इराणच्या दक्षिणेकडील चाबहार बंदराच्या पोलिस मुख्यालयाबाहेर हा आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. पाकिस्तानच्या सीमेपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात चाबहार बंदर आहे. ओमानच्या आखातातील या बंदरातून मध्य आशिया आणि भारतादरम्यान मोठ्या प्रमाणावर उर्जा आणि मालवाहतुक केली जाते.

पाकिस्तानातील बलुचि विभाजनवादी आणि सुन्नी कट्टरवाद्यांनी या भागात हल्ले केल्यामुळे हे बंदर पूर्वी अनेकदा प्रकाशझोतात राहिले होते, असे प्रांताचे सुरक्षा प्रभारी डेप्युटी गव्हर्नर मोहम्मद हादी मराशी यांनी वृत्तवाहिनीला सांगितले.
आजच्या हल्ल्यात चौघेजण ठार झाले असे चाबहारचे गव्हर्नर रहमदेल बामेरी यांनी यापूर्वी म्हटले होते. मात्र नतर मृतांचा आकडा कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्यामुळे अनेक इमारतींची काचेची तावदानेही फुटली. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारी, काही दुकानदार, महिला आणि मुलेही जखमी झाली. एकूण किती हल्लेखोरांनी हा बॉम्बस्फोट घडवला हे समजू शकलेले नाही. दहशतवाद्यांनी चाबहार पोलिस मुख्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवल्यावर कारचा स्फोट घडवण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)