पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरला जीवघेणा आजार : भारतीय गुप्तचर संस्था

नवी दिल्ली: कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहर याला जीवघेणा आजार झाल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थेने दिली आहे. पाठीच्या मणक्‍याच्या आणि मूत्रपिंडाच्या व्याधींनी पीडित मसूद अजहरवर सध्या रावळपिंडी येथील लष्करी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. मसूद अजहरला किमान दीड वर्षे हॉस्पिटमध्ये राहून उपचार घेण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. अजहर मसूदच्या आजारपणामुळे त्याचे भाऊ रऊफ असगर आणि अतहर इब्राहिम जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे काम पाहत आहेत. भारत आणि अफगाणिस्तानात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कारवाया चालू आहेत.

भारतीय गुप्तचर संस्थेने मसूद अजहरच्या गंभीर आजाराची माहिती दिली असली, तरी पाकिस्तानातील भारतीय दूतावासाने त्याल पुष्टी दिलेली नाही. मात्र मसूद अजहर दीर्घकाळ आपल्या शहरात सार्वजनिक ठिकाणी वा कोणत्याही सार्वजनिक समारंभात दिसलेला नाही, अशी टिप्पणी भारतीय दूतावासाने केली आहे.

-Ads-

सन 2001 चा संसदेवरील दहशतवादी हल्ला, 2005 चा अयोध्या दहशतवादी हल्ला, 2016 चा पठाणकोट दहशतवादी हल्ला अशा अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे मसूद अजहरचा हात आहे. राष्ट्रसंघाने जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश केलेला असला तरी चीनने त्यात सदैव आडकाठी आणलेली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)