दहशतवाद हा मिळालेला वारसा, आम्हाला जबाबदार धरले जाऊ नये : इम्रान खान

स्वतःच्या भूमिकेचे समर्थन

इस्लामाबाद: भारताबरोबर शांतता आणि सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची ईच्छा व्यक्‍त करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादाबाबत आपल्याला जबाबदार धरले जाऊ नये. कारण दहशतवाद हा आपल्याला आगोदरच्यांकडून वारशाने मिळालेला आहे. दाऊद इब्राहिम किंवा हाफिझ सईद यासारखे दहशतवादी भारतासाठी “मोस्ट वॉंटेड’ आहेत. पण पाकिस्तानच्या भूमीतूनच दहशतवाद पसरवला जाणे हे पाकिस्तानच्याही हिताचे नाही, असे खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवाद पसरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

-Ads-

1993 साली मुंबईत 12 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणारा दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. त्या बॉम्बस्फोटामध्ये 257 जण ठार झाले होते. तर 700 जण जखमी झाले होते. तर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड हाफिझ सईद पाकिस्तानमध्ये उजळ माथ्याने फिरत असतो. सईदच्या जमात उद दावा या संघटनेवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. “26/11′ च्या हल्ल्यानंतर हाफिझ सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र त्याला पाक न्यायालयाने 2009 मध्येच मुक्‍त केले. त्याच्यावर अमेरिकेने 1 कोटी डॉलरचे बक्षिसही जाहीर केले आहे.

उत्तर आणि दक्षिण वझिरिस्तान आदिवासी जिल्हा दहशतवादाला बळी पडला आहे. अफगाणिस्तान दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप अफगाण करत असते. अफगाण पाकिस्तानची भूमी दहशतवाद्यांसाठी वापरत आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. तर इतरांमुळे पाकिस्तानातील लोक दहशतवाद्यांना बळी पडत आहे, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच दिली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
5 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)