दहशतवाद, वातावरणीय बदल ही मानवतेपुढील आव्हाने : पंतप्रधान नरेंद्र मोदी

दक्षिण कोरियात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

सेऊल – दहशतवाद आणि वातावरण बदल ही दोन्ही मानवतेपुढील आव्हाने आहेत. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी महात्मा गांधीजींची शिकवण आणि त्यांची तत्वे उपगोगी ठरतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान एक दिवसाच्या दौऱ्यावर आले असताना पंतप्रधानांच्या हस्ते महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन आणि संयुक्‍त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून हे देखील उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जगभरच्या मानवतेसमोर दहशतवाद आणि वातावरणातील बदल ही दोन प्रमुख आव्हाने आहेत. महात्मा गांधींच्या जीवनाकडे बघितल्यास आपल्याला या दोन्ही आव्हाने सोडवण्यासाठीचे उपाय सापडतील. महात्मा गांधींच्या शिकवणूकीतून, त्यांच्या तत्वांमधून आणि मार्गदर्शनातून या आव्हानांवरील उपाय योजनांचा मार्ग आपल्याला मिळू शकेल, असे मोदी म्हणाले.
दहशतवादाने मानवतेलाच आव्हान दिले आहे. महात्मा गांधींचा एकतेचा संदेश, हिंसाचाराच्या मार्गावरच्या व्यक्‍तींचे हृदयपरिवर्तन करण्याचा संदेश आणि अहिंसेच्या शिकवणूकीमुळे दहशतवादाविरोधातील मार्ग मिळू शकेल, असे पंतप्रधान म्हणाले. पुलवामा इथे “सीआरपीएफ’च्या जवानांच्या बसवर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या भीषण हल्ल्यात 40 जवान शहिद होण्याच्या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधानांचे हे वक्‍तव्य अधिक सूचक आहे.

देव आणि निसर्गाने मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वकाही दिले आहे. मात्र मानवाची हाव नैसर्गिक स्रोतांनी पूर्ण होत नाही. मानवाची जीवनशैली गरजांपुरती असायला हवी. गेल्या काही काळापासून वातावरण बदलाबाबत काहीही चर्चा होत नाही. मात्र महात्मा गांधींच्या जीवनशैलीतून निसर्गाशीच जवळीक साधलेली आढळते. स्वच्छ आणि शुद्ध पृथ्वी भविष्यातील पिढ्यांना मिळावे यासाठी पर्यावरण अनुकूल अशी जीवनपद्धती त्यांनी अनुसरली होती, असे मोदी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)