भारतातील निवडणुका संपेपर्यंत तणाव राहणार : इम्रान खान

ऐन निवडणूक काळात भारताकडून हल्ला होण्याचा धोका

इस्लामाबाद  -भारतातील निवडणूक प्रक्रिया जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव कायम राहणार असल्याचे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ऐन निवडणूक काळात किंवा ही निवडणूक प्रक्रिया संपण्यापुर्वी मोदींच्या प्रशासनाकडून गैरवाजवी धाडस केले जाण्याची शक्‍यता आहे त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची भीती अजून कायम आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.

मध्यंतरी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. त्यातून पुर्ण युद्धाचा धोका उद्‌भवला होता. तथापी हा धोका अजून पुर्ण मावळला नाही असेही त्यांनी म्हटले आहे. भारतातील निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत हे चालूच राहील असे त्यांचे म्हणणे आहे. भारताकडून होणाऱ्या कोणत्याही संभाव्य आक्रमणाला तोंड देण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

तालिबानच्या नेत्यांशी इम्रानखान हे इस्लामाबादमध्ये चर्चा करणार होते पण ही चर्चा इम्रान खान यांनी रद्द केली त्या विषयी बोलताना ते म्हणाले की अफगाणिस्तानकडून त्या संबंधात नाराजी व्यक्त करण्यात आल्याने आपण ही चर्चा रद्द केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)