त्रिपुरामधील अदिवासी भागात बंदमुळे तणाव

मधबारीमधील पोलिस गोळीबाराचा पाच पक्षांकडून निषेध

अगरताळा: त्रिपुरामधील 5 स्थानिक पक्षांकडून शनिवारी बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान त्रिपुरातील आदिवासी भागातील सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले होते. “द त्रिपुरा एरियाज ऍटोनॉमस डिस्ट्रीक्‍ट कौन्सिल’अंतर्गत त्रिपुरातील दोन तृतीयांश आदिवासी भागाचे प्रशासन केले जाते. आदिवासी परिषदेचे मुख्यालय असलेल्या खुमुलविंग येथे सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद राहिली होती. तर रस्ते, शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयेदेखील बंद होती, असे पोलिसांनी सांगितले. मधबारी भागात या आठवड्याच्या सुरुवातीला पोलिसांकडून झालेल्या गोळीबाराचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी पश्‍चिम त्रिपुरा जिल्ह्यामध्ये मधबारीमध्ये झालेल्या आंदोलनावर पोलिस आणि निमलष्करी दलांनी लाठीमार केला होता आणि जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. या लाठीमारामध्ये 7 आंदोलक जखमी झाले होते.

पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा, इंडिजिनिअर नॅशनॅलिस्ट पार्टी ऑफ त्रिपुरा, त्रिपुरा स्टेट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स ऑफ त्रिपुरा आणि त्रिपुरा पीपल्स पार्टी या 5 पक्षांनी शनिवारी बंदचे आवाहन केले होते. संपूर्ण आदिवासी परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये बंद शांततेत पार पडला. अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट बंद ठेवण्यात आली. तसेच जमावबंदी आणि प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आले होते. याशिवाय कोणत्याही भागात अनुचित घटना घडली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)