जम्मूत सरपंचांच्या शपथविधीवेळी तणाव

उर्दु ऐवजी डोगरी भाषेत शपथ घेण्याचा केला होता आग्रह

जम्मू: जम्मूत आज काहीं गावाच्या सरपंचांचा शपथग्रहण सोहोळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा शपथ कोणत्या भाषेतून घ्यायची या वादातून तणाग्रस्त बनला. कठूआ जिल्ह्यातील बारनोती गावचे सरपंच शिवदेव सिंग यांनी उर्दु ऐवजी डोगरी भाषेतून शपथ घेण्याची अनुमती मागितली. त्यावेळी उपस्थितांपैकी काहींनी त्यांना विरोध केला त्यावेळी उर्दु व डोगरी भाषा समर्थकांनी घोषणाबाजी केली. नंतर या सरपंचांची डोगरी भाषेतून शपथ घेण्याची मागणी मान्य करण्यात आली. नंतर सरपंचांच्या एका गटाने आम्हाला काश्‍मीरी भाषेतून शपथ घेण्याची अनुमती दिली जावी असा आग्रह धरला त्यावेळी तणावात भरच पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमाला राज्यपाल सत्यपाल मलिक उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी घोषणबाज समुदायाला आणि सरपंचांना शांत केले. त्यानंतर हा शपथविधी सोहळा शांततेत पार पडला. राज्यपालांनी नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन केले. पंचायतींच्या निवडणुका सुरळीत पणे पार पाडण्यासाठी लोकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)