कमला नेहरु रुग्णालयात बेवारस बॅगमुळे तणाव

पुणे – कमला नेहरु रुग्णालयात एक बेवारस बॅग आढळल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यावर घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच फरासखाना पोलीस दाखल झाले होते. पथकाने बॅगेची तपासणी केल्यावर त्यामध्ये महिलेचे कपडे आढळून आले. सुमारे अर्ध्या ते पाऊण तास ही तपासणी सुरू असल्याने रुग्णालयात नातेवाई व रुग्णांचा खोळंबा झाला होता.

यामुळे काही काळ शहरात अफवाही पसरल्या होत्या. या प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी केले आहे. गुरुवारीही दगडशेठ हलवाई गणेश मंदिरासमोर एक बेवारस बॅग सापडल्याने अशी धांदल उडाली होती. पुलवाना येथील हल्ल्यानंतर पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)