तालिबानी मौलाना समी उल हकच्या दफनविधीला हजारोंचा समुदाय 

इस्लामाबाद – तालिबानी गॉडफादर म्हणून ओळख असलेल्या मौलाना समी उल हक यांची काल रावळपिंडीमध्ये त्यांच्याच घरी हत्या करण्यात आली. समी उल हकची हत्या झाली तेव्हा त्याच्या घरी कोणीही नव्हते. ही हत्या कोणी केली असावी ते अद्याप तरी सांगता येत नाही असे त्याच्या पक्षाच्या एका नेत्याने म्हटले आहे.

आज हक यांचे दफनविधी खैबर पख्तुनवा प्रांतातील त्यांच्या मूळ गावी करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय जमा झाला होता. खुशाल खान डिग्री कॉलेजच्या प्रांगणावर समी उल हक यांच्यासाठे विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यांच्या दफनविधीसाठी अफगाणिस्तानातील 65 जणांचे शिष्टमंडळही उपस्थित राहिले होते. यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हक हे अकोरा खत्तकमधील दारुल उलून हक्कानिया या शिक्षणसंस्थेचे प्रमुख होते. ही शिक्षण संस्था पाश्‍चात्य प्रसार माध्यमांमध्ये “युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद’ म्हणूनच ओळखली जाते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील बहुसंख्य तालिबानी नेते याच शिक्षणसंस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हत्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान एका धार्मिक नेत्याला मुकला आहे. त्यांचे पाकिस्तानच्या सेवेतले योगदान कायम स्मरणात राहिल असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)