दुसरी पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा
पुणे – अद्विक नाटेकर, श्रावणी देशमुख, अर्णव ओरुगंती व काव्या कृष्णन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत येथे होत असलेल्या पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील दुसऱ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत 12वर्षाखालील मुलांच्या गटात दुस-या मानांकीत अद्विक नाटेकरने अव्वल मानांकीत अभिराम निलाखेचा 5-3, 4-0 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात बिगर मानांकीत श्रावणी देशमुखने अव्वल मानांकीत सलोनी परिदाचा 4-0, 4-2 असा एकतर्फी पराभव करत अश्चर्यकारक निकालासह विजेतेपद पटकावले.
14 वर्षाखालील मुलांच्या गटात तिस-या मानांकीत अर्णव ओरुगंतीने दुस-या मानांकीत सुधांशु सावंतचा 5-3, 4-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले तर मुलींच्या गटात तिस-या मानांकीत काव्या कृष्णनने पाचव्या मानांकीत अलिना शेखचा 4-1, 5-4(5) असा टायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.
सविस्तर निकाल –
12 वर्षांखालील मुले – अंतिम फेरी : अद्विक नाटेकर (2) वि.वि. अभिराम निलाखे (1) 5-3, 4-0.
12 वर्षाखालील मुली : अंतिम फेरी : श्रावणी देशमुख वि.वि. सलोनी परिदा (1) 4-0, 4-2.
14 वर्षाखालील मुले : अंतिम फेरी : अर्णव ओरुगंती (3) वि.वि. सुधांशु सावंत (2) 5-3, 4-0.
14 वर्षाखालील मुली : अंतिम फेरी : काव्या कृष्णन (3) वि.वि. अलिना शेख (5) 4-1, 5-4(5).