मेहक कपुर, श्रावणी देशमुख, मृणाल शेळके यांचे विजय

चौथी पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरिज स्पर्धा

पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात मेहक कपुर, श्रावणी देशमुख, मृणाल शेळके, गायत्री पाटील, दुर्गा बिराजदार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मेट्रोसिटी स्पोर्टस अँड हेल्थ क्‍लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रावणी देशमुख हिने प्रेक्षा प्रांजलवर 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला. गायत्री पाटीलने रित्सा कोंडकरचा 6-2 असा तर, दुसऱ्या मानांकित मेहक कपूरने इशिता देशपांडेला 6-0 असे पराभूत केले.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्जुन अभ्यंकर,आर्य वेलणकर, अदनान लोखंवाला, अनन्मय उपाध्याय, सार्थ बनसोडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

सविस्तर निकाल :

तिसरी फेरी : 14 वर्षाखालील मुले : अर्जुन अभ्यंकर(1)वि.वि.देव तुराकिया 6-0, आर्य वेलणकर वि.वि.शारंग कसाळकर 6-3, अदनान लोखंवाला(11) वि.वि.विष्णू वाघेरे 6-0, अनन्मय उपाध्याय(7)वि.वि.वेदांत माणकेश्वर 6-0, सार्थ बनसोडे(4)वि.वि.प्रणव इंगोळे 6-3.

12 वर्षाखालील मुली : उप-उपांत्यपूर्व फेरी:

काव्या देशमुख(1) पुढे चाल वि.अनन्या देशमुख, अविपशा देहुरी वि.वि.स्नेहल गजभर 6-4, श्रावणी देशमुख वि.वि.प्रेक्षा प्रांजल 6-0, गायत्री पाटील वि.वि.रित्सा कोंडकर 6-2, सहणा कमलाकन्नन(6)वि.वि.निशिता देसाई 6-4, दुर्गा बिराजदार(3)वि.वि.आरोही देशमुख 6-2, मृणाल शेळके वि.वि.सिद्धी मिश्रा 6-1, मेहक कपूर(2)वि.वि.इशिता देशपांडे 6-0.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)