वेदांत, आरवचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज स्पर्धा

पुणे – आठ वर्षांखालील मुलांच्या गटात वेदांत जोशी, आरव मुळ्ये या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सेंटर फॉर पोलिस रिसर्च(सीपीआर), पाषाण येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 8 वर्षांखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित वेदांत जोशी याने चौथ्या मानांकित युग उपरिकरचा 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. आरव मुळ्ये याने तिसऱ्या मानांकित स्मित उंदरेचा टायब्रेकमध्ये 6-5(3) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित श्रावी देवरे हिने ताश्‍वी पांडेचा 5-0, तर तिसऱ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने अनन्या गोयलचा 5-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

सविस्तर निकाल :

8 वर्षांखालील मुले – अंशूल पुजारी(1) वि.वि. नील देसाई (8) 6-3, वेदांत जोशी वि.वि. युग उपरिकर(4) 6-3, आरव मुळ्ये वि.वि. स्मित उंदरे(3) 6-5(3), क्रिशय तावडे(2) वि.वि. युगंधर शास्त्री 4-2 सामना सोडून दिला. 8 वर्षांखालील मुली – श्रावी देवरे(1) वि.वि. ताश्‍वी पांडे 5-0, सृष्टी सूर्यवंशी(3) वि.वि. अनन्या गोयल 5-1, वीरा हरपुडे(4) वि.वि. ओवी मारणे 5-2, स्वरा जावळे(2) वि.वि. प्रार्थना खेडकर 5-2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)