14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धा
पाचगणी – मुलांच्या गटात अयान गिरधर, अपरुप राव रेड्डी या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून येथे सुरू असलेल्या रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेच्या अंतिम पात्रता फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकित अयान गिरधर याने चौथ्या मानांकित आपला राज्य सहकारी पुष्कल श्रीवास्तवाचा 9-7 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. अपरुप राव रेड्डीने दहाव्या मानांकित क्रिशनांश शर्माचा 9-1 असा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला. मुलींच्या गटात अलिना शेख, आदिती लाखे, सलोनी परिदा, काव्या कृष्णन या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
सविस्तर निकाल:
पहिली पात्रता फेरी: 14 वर्षाखालील मुले – प्रणव रेथीन (तामिळनाडू)(1) वि.वि. अर्णव बनसोडे(महाराष्ट्र) 9-1, सिद्धार्थ विनोद (महाराष्ट्र)(12) वि.वि. आदित्य भटेवरा (महाराष्ट्र) 9-6, सुचिर सेशाद्री (कर्नाटक)(2) वि.वि. आदित्य सुर्वे (महाराष्ट्र) 9-3, सार्थ बनसोडे (महाराष्ट्र)(3) वि.वि. ऋषी शर्मा (तेलंगणा) 9-2, अयान गिरधर (महाराष्ट्र) वि.वि. पुष्कल श्रीवास्तवा (महाराष्ट्र)(4) 9-7;
पार्थ देवरुखकर (महाराष्ट्र)(5) वि.वि. अथर्व बिराजदार (महाराष्ट्र) 9-5, धीरज रेड्डी (तेलंगणा)(6) वि.वि. वरद पोळ (महाराष्ट्र)9-1, अपरुप राव रेड्डी (महाराष्ट्र) वि.वि. क्रिशनांश शर्मा (महाराष्ट्र)(10) 9-1.
14 वर्षाखालील मुली: अलिना शेख (महाराष्ट्र)(7) वि.वि. क्षिरीन वाकलकर(महाराष्ट्र)9-0, आदिती लाखे (महाराष्ट्र) वि.वि. ईश्वरी मार्कंडे (महाराष्ट्र) 9-0, सलोनी परिदा (महाराष्ट्र) वि.वि. सैशा कारेकर (महाराष्ट्र) 9-5, काव्या कृष्णन (महाराष्ट्र) वि.वि. मैत्रेय इंगळे (महाराष्ट्र) 9-1.