तिसरी आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धा
पुणे – यज्ञेश वाकचौरे, वेदांत जोशी, आरव मुळे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत येथे सुरू असलेल्या पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज स्पर्धेत विजयी सलामी दिली.
सेंटर फॉर पोलिस रिसर्च(सीपीआर), पाषाण येथील टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित यज्ञेश वाकचौरेने आठव्या मानांकित नील देसाईवर 5-3 असा सनसनाटी विजय मिळवला. वेदांत जोशीने सहाव्या मानांकित ऋत्विज देशपांडेचा 5-2 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. आरव मुळे याने सातव्या मानांकित अचिंत्य कुमारचा 5-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मिहीर काळे व विहान सावंत यांनी आर्यन बॅनर्जी व विहान शहा यांचा 5-3 अशा सारख्याच फरकाने पराभव करून विजयी सलामी दिली. चौथ्या मानांकित युग उपरीकरने शौर्य गदादेचा टायब्रेकमध्ये 5-4(7-1) असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
सविस्तर निकाल –
8 वर्षाखालील मुले – पहिली फेरी – तनिष्क देवरे वि.वि.मनोन्मय शिंदे 5-1, सिद्धार्थ कोंढाळकर वि.वि.रोमिर सातघरे 5-1, यज्ञेश वाकचौरे वि.वि.नील देसाई(8) 5-3, युग उपरीकर(4) वि.वि.शौर्य गदादे 5-4(7-1), मिहीर काळे वि.वि.आर्यन बॅनर्जी 5-3, विहान सावंत वि.वि.विहान शहा 5-3, वेदांत जोशी वि.वि.ऋत्विज देशपांडे(6) 5-2, आरव मुळे वि.वि.अचिंत्य कुमार(7) 5-3, स्वराज भोसले वि.वि.अवधूत निलाखे 5-0, पुरंजय कुतवळ वि.वि.श्रेय भोर 5-2, युगंधर शास्त्री वि.वि.हर्ष परिहार 5-0.