पुणे – नगरसेवक किरण दगडे पाटील व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व चौथ्या केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे.
स्पर्धेत 100 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा आज व उद्या (रविवार) या कालावधीत किरण दगडे टेनिस अकादमीतील टेनिस कोर्टवर होणार आहे. ही स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.