स्पेनच्या निकोला कुहन याचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा

पुणे – स्पेनच्या निकोला कुहन याने स्लोवाकियाच्या सातव्या मानांकित आंद्रेज मार्टिनवर सनसनाटी विजय मिळवत येथे सुरु असलेल्या एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत थाटात प्रवेश केला आहे.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 18 वर्षीय जागतिक क्रमवारित 281 क्रमांकावर असलेल्या स्पॅनिश खेळाडू निकोला कुहन याने जागतिक क्रमवारित 191 व्या क्रमांकावर असलेल्या स्लोवाकियाच्या आंद्रेज मार्टिनचा 6-2, 6-3 असा सहज पराभव करत स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली आहे.

अन्य लढतीत भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या आर्यन गोविस, मनीष सुरेशकुमार यांचे पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारित 189 व्या स्थानी असलेल्या कॅनडाच्या ब्रेडन चेन्यूरने भारताच्या आर्यन गोविसला 6-3, 6-1 असे सहज पराभूत केले. तर, तिसऱ्या मानांकित स्वीडनच्या इलियास यमेर याने भारताच्या मनीष सुरेशकुमारला 6-4, 6-1असे नमवित विजयी आगेकूच कायम ठेवली.

यावेळी, दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या अर्जुन कढे व साकेत मायनेनी या जोडीने परिक्षित सोमाणी व दक्षिणेश्वर सुरेश यांचा 6-1, 6-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. याआधीच्या एकेरीच्या अंतिम पात्रता फेरीत इटलीच्या फ्रान्सिस्को विलार्दो, इस्राईलच्या बेन पेटेल, जर्मनीच्या लुकास गेरच आणि सेबस्तियन फॅंसीलव या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून मुख्य फेरी गाठली.

सविस्तर निकाल :

अंतिम पात्रता फेरी – फ्रान्सिस्को विलार्दो (इटली) वि.वि. डनयिलो कलचिंको (युक्रेन) 6-3, 5-7, 7-5, बेन पेटेल (इस्राईल) वि.वि. विक्‍टर डुरासोविक (नॉर्वे) 4-6, 6-3, 6-4, लुकास गेरच (जर्मनी) वि.वि. बेंजमीन हसन (जर्मनी) 6-4, 6-0, सेबस्तियन फॅंसीलव (जर्मनी) वि.वि.माईक लेस्क्‍यूर (फ्रांस) 6-4, 5-7, 6-2.

मुख्य ड्रॉ (पहिली फेरी) – ब्रेडन चेन्यूर (कॅनडा) वि.वि. आर्यन गोविस (भारत) 6-3, 6-1, इलियास यमेर (स्वीडन) वि.वि.मनीष सुरेशकुमार (भारत) 6-4, 6-1, डॅनियल मासूर (जर्मनी) वि.वि. जेले सेल्स (नेदरलॅंड) 6-4, 6-4, निकोला कुहन (स्पेन) वि.वि. आंद्रेज मार्टिन (स्लोवाकिया) 6-2, 6-3.

दुहेरी गट : पहिली फेरी: अर्जुन कढे(भारत)/साकेत मायनेनी(भारत) वि.वि. परिक्षित सोमाणी(भारत)/दक्षिणेश्वर सुरेश(भारत) 6-1, 6-1.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)