सोलारिस आरपीटीए, गोल्डन बॉईज संघांचा विजय

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आयकॉन- अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत सोलारिस आरपीटीए, गोल्डन बॉईज, डायमंड्‌स, मॉर्निंग स्टार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सोलारिस आरपीटीए संघाने टेनिस नट्‌स संघाचा 14-8असा पराभव केला. विजयी संघाकडून जयंत पवार, संदीप आगते, रवी कात्रे, महेश बर्वे यांनी सुरेख कामगिरी केली. अमित पाटणकर, जितेंद्र जोशी, मुकुंद जोशी, चिराग रूनवाल, आशिष पुंगलिया, अमित सुमंत यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर गोल्डन बॉईज संघाने ओडीएमटी संघाचा 18-5 असा पराभव करून आगेकूच केली. अन्य लढतीत डायमंड्‌स संघाने महाराष्ट्र मंडळचा 18-5 असा तर, मॉर्निंग स्टार्स संघाने एफसी क संघाचा 18-7असा पराभव केला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)