ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा : राफेल नदाल अंतिम फेरीत

सिडनी – स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत पाचव्यांदा धडक मारली असून उपान्त्य फेरीतील सामन्यात त्याने रॉजर फेडररला पराभूत करणाऱ्या स्टेफानो त्सित्सिपासचा 6-2, 6-4, 6-0 असा एकतर्फी पराभव करत आगेकूच केली.

ग्रीसच्या स्टेफानो त्सित्सिपास याने रॉजर फेडररचा 6-7, 7-6, 7-5, 7-6 असा संघर्षपूर्ण पराभव केला होता. त्यामुळे नदाललादेखील तो झुंज देईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, उपान्त्य फेरीतील सामन्यात तसे काही घडले नाही. हा सामना नदालने अतिशय सहजपणे आणि एकतर्फी जिंकत आपल्या कारकिर्दीतील 25 व्या ग्रॅंडस्लॅम फायनलमध्ये धडक मारली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नदालने दुखापतीतून सावरल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून पुनरागमन केले आहे. हा सामना सुमारे 1 तास 46 मिनिटे चालला. नदालने पहिला सेट 6-2 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्सित्सिपासने जोरदार झुंज दिली. तो सेट त्याने 6-4 असा गमवला. तर, तिसरा सेट त्याने 6-0 असा असा गमावला. या विजयामुळे नदाल 18वे ग्रॅंड स्लॅम मिळवण्याच्या एक पाऊल जवळ पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)