सीसीआय संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

एमएसएलटीए आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत सीसीआय संघाने महाराष्ट्र अ संघाचा 30-26 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए-क्रीडा संकुल कोर्ट, कोल्हापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम साखळी फेरीच्या सामन्यात सीसीआय संघाने महाराष्ट्र अ संघाचा 30-26 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत सीसीआय संघाचा सामना हा पीवायसी अ संघाशी होणार आहे. तर, अन्य लढतीत एमसीए संघाने महाराष्ट्र ब संघाचा 32-16 असा तर, महाराष्ट्र अ संघाने पीवायसी ब संघाचा 32-13 असा पराभव केला.

सविस्तर निकाल: साखळी फेरी:

एमसीए वि.वि.महाराष्ट्र ब 32-16(110अधिक गट: श्रीकांत पारेख/किरण कुलकर्णी वि.वि.गोविंद कुमार/करण सिंग 8-2; 90अधिक गट: सुनील लोणकर/नरेंद्र पवार वि.वि.राजेश नायर/ विमल राय 8-5; खुला गट: प्रवीण गायसमुद्रे/ मनीष सूर्यवंशी वि.वि.धर्मेंद्र शर्मा/आनंद मूर्थी 8-4; खुला गट: अभिजित मोहिते/डॉ सुनील बर्वे वि.वि.आकाश काळे/रोहन मानेक 8-5);

सीसीआय वि.वि.महाराष्ट्र अ 30-26(110अधिक गट: निखिल संपत/सागर इंजिनियर पराभूत वि.डॉ अतनूर/अली हुस्सेन 6-8; 90अधिक गट: किशन शहा/लव कोठारी वि.वि.विजय मेहेर/गोपाळ पांडे 8-6; खुला गट: इम्रान युसूफ/शंतनू इंजिनियर वि.वि.पृथ्वीराज इंगळे/श्रीकांत कुमावत 8-6);

महाराष्ट्र अ वि.वि.पीवायसी ब 32-13(110अधिक गट: डॉ अतनूर/अली हुस्सेन वि.वि.राजेंद्र कांगो/हनीफ मेमन 8-4; 90अधिक गट: विजय मेहेर/गोपाळ पांडे वि.वि.डॉ. अभय जमेनीस/वरून मागीकर 8-3; खुला गट: आदित्य राव/नरहर गर्गे वि.वि.अभिषेक सोमण/सारंग देवी 8-3; खुला गट: पृथ्वीराज इंगळे/श्रीकांत कुमावत वि.वि.ध्रुव मेड/मिहीर दिवेकर 8-3).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)