भाडेकरू, कामगारांची नोंद पोलीस ठाण्यात करणे बंधनकारक

भिगवण – भिगवण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 15 गावांतील घरमालकांनी तसेच हॉटेल व्यावसायिकांनी आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांची नोंद पोलीस ठाण्याकडे करावी, असे आवाहन भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी घरमालक आणि हॉटेल व्यावसायिक यांची बैठक आयोजित करीत केले. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सीव्हीआयआरएमएस अप्लिकेशनची माहिती सोलोमन आवाळे यांनी नागरिकांना दिली. भिगवण गावाची शहराकडे वाटचाल होत आहे. या ठिकाणी कागद कारखाना, अनेक उद्योगधंद्यासाठी बाहेरील गावातील नागरिक भिगवण परिसरात राहत आहेत.

अनेक हॉटेल आणि लॉज, इतरही व्यवसायासाठी अनेक परप्रांतीय मजूर कामासाठी येत आहेत. भंगार व्यावसायिक आणि मासे व्यापारी यांच्याकडे अनेक परप्रांतीय कामगार काम करतात यांची नोंद भिगवण पोलीस ठाण्याकडे करणे आवश्‍यक असल्याचे माने यांनी सांगितले. अनेक घरमालक आपल्या खोल्याबाहेरील नागरिकांना भाड्याने देत असतात. याचीही माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील राबवीत असलेल्या अप्लिकेशनची माहिती देण्यात आली. अप्लिकेशनमुळे नोंद केलेल्या कामगाराची तसेच भाडेकरूची माहिती काही क्षणात उपलब्ध होणार आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्याची माहिती मिळविणे शक्‍य होणार आहे. ही माहिती लपविणाऱ्यांविरोधात कायद्याचा बडगा उभारला जाणार आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करीत माहिती दिली. यावेळी भिगवण परिसरातील घरमालक, हॉटेल व्यावसायिक, जुन्या गाड्या खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, भंगारचा व्यवसाय करणारे व्यावसायिक, मच्छिमार व्यापाऱ्यांना बैठकीला बोलाविण्यात आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here