वाराणसीतील संकटमोचन मंदिर बॉंबने उडवण्याची धमकी

वारणसी (उत्तर प्रदेश): वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉंबने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मंदिराचे मुख्य पुजारी महंत कुमार विश्‍वंभर दास यांनी ही माहिती दिली आहे. संकटमोचन हनुमान मंदिर बॉंब स्फोट करून उडवून देण्यात येणार असल्याचे पत्र आपल्याला मिळाले असल्याचे महंत कुमार दास यांनी पोलीसांना सांगितले. मिळालेले धमकीचे पत्रही त्यांनी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी पोलीसांनी कारवाई सुरू केलेली असून मंदिराभोवतीचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मंदिर उडवण्याची धमकी हा कदाचित कोणाला तरी अडकवण्याचा डावही असण्याची शक्‍यता आहे, असे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी म्हटले आहे. कारण पत्राच्या शेवटी पत्र लिहिणाराचे नावही देण्यात आलेले आहे. त्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे.

लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा पोलीसांचा प्रयत्न आहे. यापूर्वी सन 2006 मध्ये संकटमोचन मंदिरात बॉंब स्फोट घडवून आणण्यात आले होते. त्या स्फोटात अनेकजण मारले गेले होते. त्यानंतर सन 2010 मध्येही संकटमोचन मंदिराजवळ बॉंबस्फोट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पोलीसांनी तो हाणून पाडला होता.

े.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)