विरोधकांवर टीका करण्यापेक्षा स्वताचे कर्तृत्वही सांगा ; अखिलेश यादव यांचे भाजपला आव्हान

लखनौ: भारतीय जनता पक्षाचे नेते प्रचार सभांमधून केवळ विरोधकांवर टीका करण्याचेच काम करीत आहेत. वास्तविक त्यांनी केंद्रात पाच वर्ष सरकार चालवले आहे त्यात त्यांनी काय मर्दुमकी गाजवली याची माहिती जनतेला देणे अपेक्षित आहे पण त्याची काहींही माहिती न देता ते केवळ विरोधकांवरच टीका करीत सुटले आहेत असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. लोकांना आता चौकीदार नको आहे तर रोजगार हवा आहे असा टोमणाही त्यांनी मोदींना उद्देशून मारला.

आज येथे बोलताना त्यांनी उत्तरप्रदेश सरकारने कंत्राटांवर घेतलेल्या शिक्षा मित्रांना बेरोजगार केले असून त्यांची अत्यंत हालाकिची स्थिती झाली असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले की लोक आता भाजपच्या खोटारडेपणाच्या राजकारणाला कंटाळले असून ते आता थकले आहेत. त्यांना या राजवटीपासून मुक्तता हवी आहे. लोकांच्या या मुडचा भाजपच्या नेत्यांनाही आता अंदाज आला आहे त्यामुळेच त्यांनी आता जाहीर प्रचार टाळायला सुरूवात केली आहे असा दावाही त्यांनी केला. जाहीर प्रचार सभा टाळण्यासाठी त्यांनी आता उन्हाळ्याची सबब पुढे करायला सुरूवात केली आहे असेही अखिलेश यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)