कोट्यावधी रूपयांच्या स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष

नाशिक – बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगीसह 8 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांनी हा निकाल सुनावला.

मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीचा यापूर्वीच खटल्यादरम्यान मृत्यु झालेला आहे तर पुरव्याअभावी आज बाकी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यात रेल्वे सुरक्षा बल अधिकारी आणि कर्मचारी आरोपी होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी यांचा आॅक्टोबर 2017 मध्ये मृत्यू झाला होता.

मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू

त्यानंतर आरोपी अब्दुल करीम तेलगीची पत्नी शाहिदाने तिच्या ताब्यात असलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या नऊ मालमत्ता सरकारजमा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसा अर्जही शाहिदाने वकिलांमार्फत पुणे सत्र न्यायालयात दाखल केला होता.

स्टॅम्प घोटाळ्यातून कमावलेली संपत्ती जप्त करा; तेलगीच्या पत्नीचा अर्ज


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)