तेलंगणातील 143 नामांकने रद्‌द

हैदराबाद – आगामी 17व्या लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील 143 नामांकने रद्‌द करण्यात आली, अशी माहिती आज निवडणूक अधिका-यांकडून देण्यात आली. तेलंगण राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला होणार असून बुधवार, दि. 28 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटी तारीख आहे. त्यासाठी एकूण 646 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते.

त्यापैकी 143 अर्ज नामंजूर करण्यात आले असून 503 अर्ज वैध ठरले आहेत, असे तेलंगणा निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मलकाजगिरी मतदार संघातून सर्वाधिक 27 नामांकन रद्‌द करण्यात आली आहे. येथून एकूण 40 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापाठोपाठ सिकंदराबाद येथून 21 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. राज्यातून निझामाबादमधून सर्वाधिक 189 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ नलगोंडा येथून 31, खम्मम येथून 29 आणि हैदराबादमधून 19 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)