तेलंगाणात 40 जागा लढविणार – आठवले 

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली – रिपब्लिकन पक्ष तेलंगाणात विधानसभेच्या 40 जागा लढविणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले की, पुढच्या निवडणुकीत भाजपचे सरकार येणार नाही आणि मोदी पंतप्रधान होणार नाहीत’ या शरद पवार यांच्या वक्तव्यात जराही सत्यता नाही. 2019मध्ये रालोआला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा त्यांनी केला आहे.

आठवले यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्षाचे तेलंगाणाच्या निवडणुकीत खूप चांगले प्रदर्शन राहणार आहे. आरपीआय 40 जागा लढविणार आहे आणि आरपीआयचा उपमुख्यमंत्री सुध्दा होवू शकतो. सध्या भाजपशी आघाडी करण्याची चर्चा केली जात आहे. बहुजन महासंघाचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्यात झालेल्या आघाडीचे स्वागत आहे. या आघाडीचा फायदा भाजपला महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात होईल, असेही ते म्हणाले.
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती महाराष्ट्रात लढण्याची तयारी करीत आहेत. परंतु, आरपीआय आणि बहुजन महासंघ आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर मायावती यांचा निभाव लागणार नाही, असेही आठवले म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)