तेलंगणचे खासदार रेड्डी कॉंग्रेसच्या वाटेवर 

नवी दिल्ली  – तेलंगणमधील सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समितीला (टीआरएस) ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हादरा बसला. खासदार के.विश्‍वेश्‍वर रेड्डी यांनी मंगळवारी टीआरएसला रामराम ठोकला. त्यापाठोपाठ त्यांनी बुधवारी देशाची राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे ते कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची 23 नोव्हेंबरला तेलंगणमध्ये सभा होणार आहे. त्या सभेत रेड्डी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. तेलंगणमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या राज्यात 7 डिसेंबरला मतदान होईल. अशात रेड्डी यांचा संभाव्य प्रवेश कॉंग्रेसला बळ देणारा ठरणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)