तेलंगण मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत 41 टक्‍क्‍यांनी वाढ 

हैदराबाद  – तेलंगणचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के.चंद्रशेखर राव यांच्या संपत्तीत मागील चार वर्षांत सुमारे 41 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, टीआरएसचे निवडणूक चिन्ह कार असले तरी राव यांच्या मालकीचे एकही वाहन नाही.

तेलंगण राज्यात 7 डिसेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी राव यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या अर्जासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये राव यांनी संपत्तीचा तपशील दिला आहे. राव यांच्याकडे 2014 मध्ये 15.95 कोटी रूपयांची संपत्ती होती. ती आता 22.61 कोटी रूपये इतकी झाली आहे. त्यांच्याकडे चार वर्षांपूर्वी सुमारे 38 एकर शेतजमीन होती. मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्या शेतजमिनीत 16 एकरांची भर पडली आहे. राव यांच्या नावावर सुमारे 9 कोटी रूपयांचे कर्ज आहे. स्वतंत्र तेलंगण राज्यासाठी केलेल्या आंदोलनावरून त्यांच्याविरोधात 64 गुन्हे दाखल असल्याचेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)