तेलुगुचा तमिल थालाईवाजवर सलग चौथा विजय

तेलुगू टायटन्सने गेल्या मोसमात सलग ३ वेळा तामिल थालाईवाजचा पराभव केला होता. गेल्या सिजनची ही विजयी घौडदौड कायम ठेवत तेलुगू टायटन्सने आजचा सामना जिंकल्याने त्यांचा हा तामिल थालाईवाज विरुद्धचा सलग चौथा विजय ठरला 

प्रो कबड्डीमध्ये तिसऱ्या दिवशी झोन बी मध्ये तेलुगू टायटन्स विरुद्ध तामिल थालाईवाज  यांच्यात  सामना झाला. या सामन्यात  तेलुगु टायटन्स 33-28 असा विजय  मिळवला. राहुल चौधरीचे  सुपर 10 या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. सामन्यात  एकावेळी दोन्ही संघ 7-7असे बरोबरीत होते. त्यानंतर पहिल्या सत्रातील शेवटच्या 5 मिनिटात तेलुगु संघाने खेळ उंचावला.त्यांनी शेवटच्या मिनिटात  तेलुगू संघाने तामिल संघाला ऑल आऊट करत गुणसंख्या 10-17 अशी केली.
दुसऱ्या सत्रातील पहिले पाच मिनिटांचा खेळ झाला तेव्हा सामना 20-15 असा तेलुगू संघाच्या बाजूने होता. त्यानंतर विरोधी संघाला संधी न देता तेलुगुने आपली आघाडी 24-17 अशी केली.
आपली पिछाडी भरून काढण्याची जबाबदारी अजय ठाकुरने घेतली.त्याने तेलुगची आघाडी 30-24 अशी कमी केली.त्यानंतर तेलगू संघाने अजय ठाकुरला बाद केले.अजय ठाकूर बाद झाल्यावर सामन्याचे  चित्र स्पष्ट झाले आणि हा सामना तेलुगुने 33-28 असा जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)