तेलगु देसम पक्षाच्या नेत्यांचे अमेरिकेतील अपघातात निधन 

अमरावती: आंध्रप्रदेशातील आमदार आणि तेलगु देसम पक्षाचे नेते एम.व्ही. व्ही. एस मुर्ती यांचे अमेरिकेत एका अपघातात निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांनी या आधी दोन वेळेला लोकसभेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. मुर्ती आणि त्यांच्या समवेतचे अन्य तीन जण अमेरिकेत अलास्का जवळ एका हमरस्त्यावर झालेल्या अपघातात ठार झाले. त्यांच्या मोटारीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. सोमवारी दुपारी ते एका अभयारण्याला भेट देण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.
त्यांचा मृतदेह भारतात परत पाठवण्यासाठी उत्तर अमेरिकेतील तेलगु संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत त्यासाठी ते अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. मुर्ती हे तेलगु देसम पक्षाचे संस्थापक एन टी रामाराव यांचे निकटचे सहकारी होते. त्यांनी विशाखापट्टणम येथे गांधी इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलाजी ऍन्ड मॅनेजमेंट नावाची शिक्षण संस्था स्थापन केली असून त्यांच्या या संस्थेला अभिमत विद्यापीठ म्हणूनही मान्यता मिळाली आहे. ते 1991 आणि 1999 या दोन वेळेला विशाखापट्टणम मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते. सन 2014 साली त्यांची स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवड झाली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबु नायडू यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्‍त केला आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)